Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : नोकरीचे आमिष दाखवत तरूणीवर अमानुषपणे अत्याचार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर अमानुषपणे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी चाळीसगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

चाळीसगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोकरीची आवश्यकता असल्याने तिची ओळख आसिफ हुसेन खान (वय-४५) रा. इस्मालपुरा चाळीसगाव याच्याशी झाली. त्याने तरूणीला नोकरीचे आमिष दाखवत तिच्याकडून १ लाख रूपये घेतले. त्यानंतर २१ जून २०२१ ते २७ मार्च २०२३ दरम्यान वेळोवेळी आसिफ हुसेन खान याने तरूणीला ब्लॅकमेलींग करून अमानुषपणे नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच याबाबत कुणाला काहीही सांगितले तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर तरूणीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आसिफ हुसेन खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयिताला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

Exit mobile version