Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : नराधम बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नोएडा (वृत्तसंस्था) एका ४५ वर्षीय नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे घडली आहे.

 

आरोपी बाप बिहारमधील मजूर आहे. आरोपीच्या पत्नीने फेज २ पोलीस स्टेशनमध्ये २४ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. दारू पिऊन तिच्या पतीने आपल्या मुलीवर बलात्कार केला असा आरोप महिलेने केला आहे. परंतु, समाजात काय विचार केला जाईल या लाजखातर आणि कुटूंबाच्या नाकारण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version