Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : नराधम बापाकडून मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापाकडून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व वडील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील घरी आले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घरात अभ्यास करीत असतांना तिच्या वडीलांनी तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर बाहेर काम करत असलेली पिडीत मुलीच्या आईने घरात धाव घेवून मुलीला सोडविले. त्यानंतर पिडीतेसह तिच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात तक्रार दिली. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Exit mobile version