Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय गांधी निराधार , श्रावण बाळ योजनेतील सावळा गोधंळ दूर करा

 

जळगाव, प्रतिनिधी ।  संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेत सावळा गोंधळ सुरु असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे निवासी उप जिल्हाधिकारी राहुल पाटी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा गरीब, गरजू, विधवा, परितक्त्या, अंध-अपंग, निराधार वयोवृद्ध हे लाभ घेत असतात. मागील २ वर्षापासून ह्या योजनेत जिल्हाभर सावळा गोंधळ सुरु आहे. संबंधित चौकशी अधिकारी (तलाठी) हे घरी बसून चौकशी शेरा मारून प्रकरण रद्द करतात. संबधित नायब तहसीलदार हे कार्यालयात थांबत नसल्याने जिल्हाभरात या योजेनेची प्रकरणे धूळ खात पडलेले आहेत.  संजय गांधी निराधार योजना ही विधवा व निराधार महिलांसाठी आहे.  या योजनेतील अनेक महिलांचे नविन प्रकरण, जुने प्रकरण त्वरित निकाली कढ़ावे. ज्यांची पेन्शन बंद आहे किंवा इतर काही तंत्रिक कारण, कागदपत्रांची अपूर्णता अशा निराधार, गोर गरीब लोकांना नीट वागणूक देण्यात यावी. त्यांना योग्य मार्गदर्शन कोणी देत नसल्याने ते चकरा मारून थकले आहेत. कोरोनाच्या लॉकडवूनमुळे त्यांच्यासमोर अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने त्वरित बैठक बोलावून निराधार व परित्यक्ता महीलाना त्वरित पेन्शन देवून मदत करावी. या योजनेचा गरजूंना तत्काळ लाभ मिळावा यासाठी त्वरित चौकशी समिती नेमून तालुका निहाय प्रलंबित प्रकरणांची मंजुरी देण्यात देऊन गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अल्पसंख्यनक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, सचिव अब्दुल रउफ शेख, जिल्हाउपाध्यक्ष अकबर काकर, जिल्हा अपंग अध्यक्ष मुंतजिम खान, जिल्हा सचिव अपंग अफजल शेख, एम. एम, खान आदींची स्वाक्षरी आहे. 

 

Exit mobile version