Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव

मुंबई प्रतिनिधी । विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून आता संजय कुमार हे राज्याचे नवे मुख्य सचिव बनणार आहेत.

विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. दरम्यान, एक जुलैपासून मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून, गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. १९८४च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील. दरम्यान, अजोय मेहता उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहणार असून यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Exit mobile version