Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : स्थलांतरित नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन

भुसावळ, प्रतिनिधी । येथील शासकीय निवारागृहातील स्थलांतरित नागरिकांना प्रशासनाच्या वतीने कोरोना पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत काळजी घेण्यासाठी समुपदेशन देण्यात येत आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये जनजागृती होऊन कोरोना सोबत लढण्याची ऊर्जा या ठिकाणी नागरिकांना मिळत असल्याचे आज पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने स्थलांतरित नागरिकांना शहरातील शासकीय निवारागृहात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणासह, नास्ता व इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जात असल्यातरी त्यासोबतच जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या व रेणुका प्रसाद व भारती पाटील मार्गदर्शन नुसार शोभा यंशवन्त हंडोरे महिला बाल सहाय्य कक्ष जळगाव यांनी या नागरिकांना समुपदेशन करून कोरोना सोबत लढण्याची ताकत दिली. यावेळी निवासी कॅम्प मधील नागरिकांनी समुपदेशन कर्त्यांचे व मनोबल दृढ करणेसाठी प्रशासनाचे देखील आभार मानले. यावेळी जिल्हा प्रशासनच्या वतीने भुसावल शहरचे अधिकारी तलाठी रतनानि, व रेल्वे कमरचारी व प्रशांत वैशवण उपस्थित होते

Exit mobile version