Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : शेंदूर्णी येथे पोलिसांचे पथसंचलन

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । आज मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच आर.सी.पी फोर्स जळगाव यांचे संयुक्त पथसंचलन करण्यात आले.

संचारबंदीत काही नागरिक काहीही काम नसतांना बाहेर फिरत असल्याने अशांना आळा घालण्यासाठी पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनास प्रारंभ करण्यापूर्वी पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक सूचना दिल्या. त्यांनी पथसंचलन करतांना एका काठीचे अंतर ठेवण्याची सूचना, सर्वांनी तोंडाला मास्क लावावे.पथसंचलन दरम्यान कोणीही एकमेकांशी बोलू नये.मोबाईचा वापर करू नये आदी सूचना दिल्यात. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी शेंदूर्णी येथे पोलीस पथसंचलनाला,शेेंदूर्णी दुरक्षेत्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्थानक, पहुर दर्जा,खाटीक गल्ली,डॉ.आनंदा बारी दवाखाना, वाडीदर्जा,दत्त मंदिर चौक, नुराणी मस्जिद,होळी मैदान, वाल्मिक नगर चौक,धनगर गल्ली,पारस चौक,बाजारपेठ, महावीर मार्ग पहुर दर्जा व पुन्हा पोलीस दुरक्षेत्र असे पथसंचलन करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असतांना नागरिकांनी कायद्याचे पालन करून अनावश्यक घराबाहेर पडू नये नाहीतर अश्या भटकणाऱ्या व्यक्तीवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version