Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : यावल येथे बिअरबारला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील

यावल, प्रतिनिधी । येथील फैजपूर मार्गावर असलेल्या एका बिअरबारवरून कोरोना संचारबंदीच्या काळात एका तथाकथित दारू विक्रेत्याला पोलिसांनी गैरमार्गाने दुचाकी वाहनावर देशी-विदेशी दारूची वाहतूक करतांना पकडण्यात आल्यानंतर बियर बारवरून हे दारु खरेदी केल्याचे समोर आल्याने उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ सदरचे बियर बार सील केले आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून याचा गैरफायदा घेत काही अवैध धंद्यावाले सक्रिय झाल्याचे दिसून येत असून आज यावल शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या बुरुज चौकात यावल चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असताना साकळीच्या राहणाऱ्या विजयसिंग नथुसिंग लोधी हा छुप्या मार्गाने बेकायदेशीररित्या त्याच्या ताब्यातील मोटर सायकल डिकीतून सुमारे १४ हजार रुपये किमतीचे अवैध मार्गाने दारू घेऊन जाताना पकडले त्या व्यक्तीकडून पोलिसांनी माहिती विचारली असता सदर इसमाने ही दारू आपण काय यावल फैजपूर मार्गावरील असलेल्या गोकुळ बियर बार अपरमेंट रूमवर मधून खरेदी केल्याचे सांगितले सदा संचारबंदी च्या काळात सर्व बियर बार हॉटेल्स बंद असताना या बियर बार मालकाकडून जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशा चे उल्लंघन करताना राजरोसपणे काही बियर बार आणि हॉटेलवर अशा प्रकारे चढत्या भावाने दारूची विक्री केली उघडकीस आले असून यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर सदा ची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे भुसावळ या विभागाचे उपनिरीक्षक के. एन. बुवा यांनी गोकुळ बियर बार चा तात्काळ पंचनामा करून सदरचे हॉटेल गोकुळ परमिट रूम व बियर बार सील केले आहे संचार बंदीच्या काळात यावल तालुक्यात यावल शहर आणि विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असल्याची ओरड अनेक सुज्ञ नागरिक कडून करण्यात येत असून या गंभीर विषयाकडे देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Exit mobile version