Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी तरुणांचा पुढाकार

कासोदा, प्रतिनिधी। देशात संसर्गजन्य साथरोग कोरोना विषाणूने थैमान घातले आहे . यासाठी भारतात २१ दिवसाचा लॉक डाउन ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी सुरू आहे. याकाळात पोलिसांवर ताण वाढला असून त्यांच्या मदतीसाठी कासोद्यातील तरुणांनी पुढाकार घेत कोरोना दक्षता समिती स्थापन केली आहे.

संसर्गजन्य कोरोना व्हावयरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार , शासन आणि पोलीस प्रशासनासह वैद्यकीय अधिकारी नागरिकांना घरात थांबण्याची विनंती करीत आहेत. परंतु लोकांना ते सांगूनही समजत नाही व बाहेरच निघत आहेर. म्हणून . पोलीस प्रशासनाची व शासनाची अत्यावश्यक काळात मदत करण्यासाठी विना मोबदला व स्वखर्चाने कासोद्यातील माजी सैनिक तथा एरंडोल आगार प्रमुख गोविंदा बागुल , यांच्यासोबत हभप संजय महाराज जमादार , हरिष पटेल , मनोज पिंगळे , उमेश नवाल , गोविंद चौधरी , शैलेश मंत्री , पत्रकार सागर शेलार, राहुल मराठे, शैलेश मंत्री , शैलेश पांडे, गोविंद अग्रवाल , पवन राजपूत हे पुढे आले आहेत. पोलीस प्रशासनाची कमतरता असल्याने दक्षता समितीतील सदस्य पुढे आले आहेत. एरंडोल येथील तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या सही व शिक्यासह आयकार्ड तयार करून मिळाले आहे. , सर्वाना त्या आयकार्डचे वाटप कासोदा पोलीस स्टेशन चे सपोनि रविंद्र जाधव व भैय्यासाहेब राक्षे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पीएसआय नरेश ठाकरे , पो.कॉ.दिपक आहिरे पो.स्टे.चे सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य , व कर्मचारी पत्रकार उपस्थित होते. अत्यावश्यक सेवा परवाना पत्रात कोरोना दक्षता समितीतील सदस्यांनी आज अत्यावश्यक सेवा पुरविण्याऱ्या सर्व किराणा दुकान , दवाखाने , मेडिकल , दूध डेअरी , कड धान्य दुकान यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना माल घेतेवेळी अंतर असावा म्हणून सोशल डिस्टनसाठी आखण्यात येणाऱ्या बॉक्ससाठी सरपंच मंगलाबाई राक्षे व भैय्या राक्षे यांनी पंधरा कलर घेऊन दिला. ग्राम पंचायतचे कर्मचारी नेमून दिले. दक्षता समिती व ग्रामपंचायत कर्मचारी सदस्यांनी वाटणी करून आप आपल्या वार्डात येणाऱ्या वरील सर्व दुकानांसमोर सर्कल आखून दिले. यासाठी नितीन शितोळे , विजय चौधरी , सुभाष पाटील, यशवंत राक्षे , विलास पाटील , तुषार मोरे , संदिप राक्षे , दिपक शिंपी सह सर्व नागरिक व दुकानदारांनी सहकार्य केले .

Exit mobile version