Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप

रावेर, प्रतिनिधी ।  कोरोना या महामारीमुळे माननीय प्रधानमंत्री यांच्या आदेशानुसार देशभरात लॉक डॉउन असल्यामुळे गेल्या दहा बारा दिवसांपासून मजूर बेरोजगारीच्या सावटाखाली आहेत. अशा गरजू गरीब आदिवासी बांधवांना पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे शिधावाटप करण्यात आले.

संचारबंदीच्या काळात गोर गरीब गरजू आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तुची गरज भासत असल्यामुळे  अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराकडून परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान गादिपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात या गरजू लोकांना शिधा वाटप करण्यात आले. बुडतसे जन, न पहावेसी डोळा , म्हनूनि कळवळा येत असे। या संतांच्या उपदेशानुसार अश्या कोरोना सारख्या महामारीप्रसंगी विविध प्रकारच्या सेवा वेगवेगळ्या माध्यमद्वारे देशभरातील दानशूर लोकाकडून होताना दिसत आहे. असेच पाउल अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराकडून उचलण्यात आले असून पालसह परिसरातील शेकडो आदिवासी, गोर ग़रीबाना श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज तसेच ब्रम्हचारी यांच्या सानिध्यात परम पूज्य सदगुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावन धाम पाल येथून पाच किलो गहुचे पीठ,  तेल, भाजीपाला अश्या विविध प्रकारच्या जीवनावश्यक शिधा वाटप करण्यात आले.

वाहन चालकांना भोजन वाटप

सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या हे वृन्दावन धाम पाल आश्रम मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर असल्याने कोरोना महामारिच्या लॉकडॉउन मुळे काही दिवसांपूर्वी या सिमेवर पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू कश्मीकडील वाहन अडविन्यात आले होते. तर अश्या परिस्थितीत शेकडो वाहन चालक, क्लीनर याच्यावर उपासमारिचे वेळ आली होती. अश्या परिस्थितीत त्याची भूक भागविन्याकरिता पाल आश्रमा तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  ही सर्व कामे सोशल डिस्टनसिंग चे भान ठेऊन करण्यात येत आहे. कोरोना सारख्या महामारिच्या निवारनाकरिता अनुष्ठान व प्रार्थना चैतन्य साधक परिवारातर्फे आपापल्या घरात राहून करण्यात येत आहे.

Exit mobile version