Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : आरोग्य सेविका शोभा पाटील यांच्याकडून माक्स वाटप

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । कोरोना साथरोग संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी नवनवीन उपाय योजना शासन व प्रशासन करीत असून खारीचा वाटा घ्यावा म्हणून कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका शोभा पाटील यांनी आज दि.७ एप्रिल रोजी जागतीक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्वतः बनविलेल्या माक्सचे वाटप केले.

आरोग्यसेविका शोभा पाटील यांनी कासोदा व एरंडोल प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी तसेच कासोद्यातील आशा सेविका , ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , ग्रा.पं. सद्स्य , पोलीस व पत्रकार बांधव , कोरोना दक्षता समिती सदस्य व रिंगणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तथा त्या गणातील जि.प. सदस्य नानभाऊ महाजन व गावातील काही पदाधिकारी यांना स्वखर्चाने हातरुमालाचे माक्स बनवून वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाने गावात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याप्रसंगी सपोनि रवींद्र जाधव तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. नाजीम शेख , कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.निशाद शेख , डॉ. चेतन वाघ , आरोग्य सेविका शोभा पाटील , आशा सेविका , पत्रकार राहुल मराठे , सरपंच पुत्र भैय्या राक्षे , जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित होते. संचारबंदीचे उल्लंघन न करता आशा सेविका , पत्रकार , जि.प. सदस्य या सर्वांना एकत्र न बोलावत प्रत्येकी एक सदस्य बोलवून घरपोच वाटप केले. असता पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी त्यांचे कौतुक केले.

Exit mobile version