Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदी : आदिवासी पाड्यात शासकीय आश्रम शाळेतील वस्तूंचे वाटप

यावल, प्रतिनिधी । आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यलयाच्या सूचनेसुमार शासकीय आश्रम शाळेतील नाशवंत वस्तूंचे आदिवासी पाड्यात वितरण करण्यात आले.

गरोदर माता तसेच आदिवासी पाड्यातील लहान मुलांना शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक मार्फत आश्रम शाळेतील नाशवंत वस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आदिवासी पाडे वस्तीवर जाऊन अन्नधान्य वाटप केले. लोकांना कोरोना या विषाणूची माहिती देऊन त्यांनी जनजागृती केली. आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व वस्तीगृहातील गृहपालांना विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या संपर्क राहून योग्य ते मार्गदर्शन करण्याचे सांगितले. प्रकल्पातील अटल आरोग्य वाहिनीच्या अंबुलन्स व डॉक्टर यांच्यामार्फत आजारी विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या लोकांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Exit mobile version