Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते संकल्प अभ्यासिकेचे उद्घाटन!

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करत एका छताखाली सर्व विद्यार्थ्यांचे अभ्यास व्हावे या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरात संकल्प अभ्यासिकेचा उद्घाटन आज आमदारांच्या हस्ते येथील करगांव रोड, कायाकल्प क्लिनिकच्या वरच्या मजल्यावर करण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील करगांव रोड, कायाकल्प क्लिनिकच्या वरच्या मजल्यावर आज संकल्प अभ्यासिकेचा उद्घाटन आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वामन पाटील, करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाधव (सांगवी), विश्वनाथ राठोड, राहूल गायकवाड व संकल्प अभ्यासिकेचे संचालक जीवन शिवलाल चव्हाण (सांगवी) तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी हे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना पुस्तके व बसायला खुर्ची देणार असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version