Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री सप्तश्रुगी देवी संस्थांच्या सचिवपदी सुधाकर सोळंके

यावल,  प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथून जवळच असलेल्या शिरागड येथील लहान गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री निवासिनी सप्तश्रुगी देवी संस्थांच्या सचिव पदी पोलिस पाटील सुधाकर नारायण सोळंके यांची निवड करण्यात आली.

 

श्री निवासिनी सप्तश्रुगी देवी संस्थानची मासिक सभा संस्थानचे अध्यक्ष शांताराम सदु सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सचिव म्हणुन कार्यरत असलेले आंनदा बारकु पाटील यांचे नुकतेच निधन झाले, त्याच्या रीक्तजागी नवीन सदस्यं निवड करण्यात यावी या विषयावर चर्चा  करण्यात आली असता गावातील पोलिस पाटील सुधाकर नारायण सोळंके यांची एकमताने निवड बैठकीत करण्यात आली आहे. यावेळी पथराडे – शिरागड ग्रामपंचायत सरपंच योगीताताई सोनवणे, प्रतापदादा सोनवणे  , हिम्मत सयाजी सोळंके, आण्णा सदु सोळंके ,योगेश शांताराम सोळंके यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

Exit mobile version