Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई व चांगदेव महाशिवरात्री यात्रा रद्द

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी ।  कोरोना विषाणूने सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये थैमान घातलेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुक्ताईनगर तहसीलदार यांनी प्रेस नोट द्वारे यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.   

मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई मंदिर जुनी कोथळी, नवे मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर, चांगदेव महाराज मंदिर चांगदेव व श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान मेहून तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव आयोजित करण्यात येत असतो.  मात्र, कोरोनाचा  वाढता संसर्ग पाहता या वर्षी दि. ८ ते ११ मार्च दरम्यान यात्रा उत्सव होणार होता. परंतु, सध्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कोरोनाविषाणू चे वाढते प्रमाण लक्षात घेता यात्रा रद्द करण्यात येत आहे. जेणेकरून नमूद ठिकाणी कुठलीही गर्दी जमा होणार नाही व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव, फैलाव होणार नाही अशी कार्यकारी दंडाधिकारी श्वेता संचेती तहसीलदार मुक्ताईनगर यांनी प्रेसनोट द्वारे कळविले.

 

Exit mobile version