Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघाच्या सुभाष बरडीया यांची निवड

 

चोपडा, प्रतिनिधी । श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघाची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेत संघपती सोहनराज टाटीया यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसह नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

मागील २२ वर्षे श्रीसंघाची धुरा सांभाळणारे संघपती सोहनराज टाटीया यांनी राजीनामा दिला आहे. या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात नवीन अध्यक्ष पदावर संघाचे वरिष्ठ सदस्य सुभाषचंद किसनलाल बरडिया, उपाध्यक्षपदी प्रदीप मिलापचंद बरडिया, सेक्रेटरीपदी संजय चंपालाल बरडिया, तर कोषाध्यक्षपदी विनोद सोहनराज टाटीया व सह कोषाध्यक्षपदी सह कोषाध्यक्ष महावीर उमेदमल टाटीया यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सोहनराज टाटीया यांच्या हस्ते करण्यात येऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजातील सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करणयात आले.

Exit mobile version