Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेतर्फे सैनिक व जेष्ठ नागरिकांचा सन्मान

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील  श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील  सैनिक व जेष्ठ मान्यवर व गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.

 

 

नुकताच संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक, जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  या सोहळ्यात कारगिल युद्धात विजय मिळवून देणारे सैनिक फैजपूरचे सुपुत्र भानुदास वसंत बेंडाळे  धनेश्वर बेंडाळे हे दोघे बंधू तसेच गोविंदा नारखेडे, सुपडू झालटे, गंगाधर कोळी, जनार्धन पाटील, भालचंद्र मेढेया सैनिकांचा सत्कार करण्यात आला.  हा सत्कार प्रमुख पाहुणे माजी आ. अरुण पाटील  व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

फैजपूर शहर व सहकारी संस्थांचे विकासासाठी योगदान देणारे  भास्कर कांशीराम चौधरी, चोलदास बोमटू पाटील, माजी नगराध्यक्ष   पंडित हिरामण कोल्हे, विजय कुमार परदेशी, अंबादास वायकोळे, एकनाथ पुरषोत्तम चौधरी, खेमचंद नामदेव नेहते, सी. के. चौधरी यांचा सन्मान संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे व संचालक नीलकंठ सराफ चौधरी, सुरेश परदेशी, गणेश चौधरी, व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील  यांच्या  हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी यांना बक्षिसे व प्रमाणपत्र व ट्राफि देऊन  गौरविण्यात आले.  या कार्यक्रमात पंडित कोल्हे,  भास्कर चौधरी, फैजपूर एपीआय सिद्धेस्वर आखेगावकर, माजी आमदार यांनी मनोगत व्यक्त केले. भारत देशाचे सैनिकप्रती आदरभाव प्रगट करून सैनिक हा आमचा स्वाभिमान आहे. त्यांच्यामुळे देश व आम्ही सर्व सुरक्षित असल्याची भावना अध्यक्षीय भाषणात नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केली.  कार्यक्रमात  संचालक अनिल नारखेडे,  रेवती पाटील, लतिका बोडे,   भास्कर बोडे,  पदमाकर पाटील, पुंडलिक पाटील, नितीन फिरके, प्राचार्य प्रदीप राणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न झाली.  सभेत ९ टक्के लाभांश  जाहीर करण्यात आला.  संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी  सादर केली . सभेचे सूत्रसंचालन व्यवस्थापक  जयश्री चौधरी यांनी केले.  सभेस नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी,  उमाकांत पाटील,  गोटू भारंबे, नितीन चौधरी, हर्षद महाजन न्हावी, सुनील नारखेडे, शेखर चौधरी, दिगंबर बऱ्हाटे, विलास नेमाडे,  भागवत पाटील, गणेश पाटील, काशिनाथ वारके यांची उपस्थिती होती.  यशस्वीतेसाठी जयश्री चौधरी, मनोज वायकोळे, राजेंद्र मानेकर, चंदू पाटील, राजू मिस्त्री, मयुर नारखेडे, पुष्कर नारखेडे यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version