Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘श्री राधाकृष्ण प्रभातफेरी’तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी धनादेश

भुसावळ- कोरोना महामारीच्या सहाय्यता निधीसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान सहाय्यता निधीत येथील श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे २ लाख ८ हजाराचा धनादेश तहसिलदार दीपक धिवरे यांना सुपुर्द करण्यात आला.

आमदार संजय सावकारें व राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. या वेळी प्रभातफेरी सदस्य संजय अग्रवाल, गोपाल तिवारी, जी.आर.ठाकुर,डॉ.देवेन्द्र शर्मा,अर्जुन पटेल उपस्थित होते. श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे दररोज सकाळी अर्ध्या तासाची पायी दिंडी काढण्यात येते. ही प्रभातफेरी आद्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय व स्वास्थवर्धक गतिविधीत नेहमी पुढाकार घेते.

सहाय्यता निधी प्रभातफेरी प्रमुख राधेश्याम लाहोटी,संजय एन.अग्रवाल,बृजमोहन अग्रवाल, प्रेमराज लढ्ढा,गोपाल तिवारी, डॉ.देवेन्द्र शर्मा, गजानन ठाकुर, लीलाधर अग्रवाल, संतोष नागला, सुनील बी.अग्रवाल, सुनील जैन, मदन बोरकर,अर्जुन पटेल, लालजी पटेल, ईश्‍वर पटेल, सुनील र.अग्रवाल, श्री सुन्दरकाण्ड आस्था मंडळ व श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version