श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे निरोप समारोहाचे आयोजन

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पळासखेडे बु. श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या अंतिम वर्ष बी. फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप देण्यात आला.

 

निरोप समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट, डी. फार्मसी विभाग प्रमुख, प्रा. सुनील आर. बावस्कर आणि महाविद्यालयाचे उप-प्राचार्य, प्रा. प्रफुल्ल पी. पाटील मंचावर उपस्थित होते.
मनोजकुमार कावडीया यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये असणारे शिक्षणाचे महत्त्व सांगून महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. मयूर आर. भुरट यांनी आठवणीना उजाळा दिला. प्रा. सुनील आर. बावस्कर यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान “रेझोनन्स २K२२” (वार्षिक स्नेह-संमेलन) मधील विविध उपक्रमातील विजेते आणि उपविजेते यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या GPAT पात्रता धारकांनाही विशेष मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. दरम्यान “मेगा कॅम्पस ड्राईव्ह- २०२२” मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या सोनेरी आठवणी सांगितल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मनोरंजनपर विविध उपक्रम केले आणि महाविद्यालयाची आठवण म्हणून त्यांना मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. तृतीय वर्ष बी. फार्मसीचा विद्यार्थी निलेश नाईक यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रुपल एम. भुरट व प्रा. भुषण पी. गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम पहिले. यशस्वीतेसाठी तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कामकाज पहिले.

Protected Content