Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री. गो. से. हायस्कूलच्या शिक्षकांचा लसीकरण शोध मोहीमेत सहभाग

पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण झालेले नाही अशांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. यात श्री. गो. से. हायस्कूलचे शिक्षक शिक्षीका सहभागी झाले आहेत.

 

पाचोरा नगरपालिका प्रशासनातील आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करून कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या शोधमोहीमेत प्रभाग क्रमांक १ मधील हनुमान वाडी, नागसेन नगर थेपडे नगर, आशिर्वाद ड्रीम सिटी, रेणुका कॉलनी, मिलिंद नगर, प्रभाग क्रमांक एक मधील सर्व भाग व तेथील नागरिकांचा कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न. पा. सभागृहीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते संजय वाघ, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या आदेशानुसार पाचोरा श्री. गो. से. हायस्कुल मधील सकाळ – दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू – भगिनी यांनी वरील परिसरातील घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस बाकी असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करीत आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन. आर. पाटील, आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू-भगिनी काम पाहत आहेत यामुळे नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये जनजागृतीचे काम सुरू असुन लवकरात लवकर हा प्रभाग लसीकरण मुक्त होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version