Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री गुरुदेव सेवा आश्रम तर्फे महिलांचा सन्मान

जामनेर ,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज आमच्या आया-बहिणींना मुलांना चांगले संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. डोक्यावर केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा चांगले संस्कार आणि विचार देऊन विवेकानंद व्हा. अशा पद्धतीने आईने संगोपन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांनी केले.

 

ते श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सत्कार व सन्मान सोहळ्यात बोलत होते. आज मुले संस्कारहीन होताना दिसत आहे. ती संस्कार हीनता आपल्या भारतीय संस्कृतीला अशोभनीय व मारक ठरत आहे. ‘ जब तक संस्कृती हैं तब तक आस है, बिना संस्कृती मनुष्य का विनाश आहे.’ म्हणून आज आपण महिलांचा गौरव करीत आहोत असे गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जामनेर शहरातील महिला पत्रकार, नगर परिषदेतील महिला कर्मचारी, नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर वस्त्र दान हे श्रेष्ठ दान असल्याने ट्रस्टतर्फे सर्व महिला भगिनींना साडी भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी सन्मानित महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना शिंदे तर सूत्रसंचालन संजय पवार, आभार प्रविण राजनकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version