Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीराम विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलितश्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती  राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात आला.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे सचिव अशोक  लाडवंजारी तर प्रमुख अतिथी विद्यालयाचे संचालक वासुदेव सानप, भगवान लाडवंजारी,श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे मॅडम, या होत्या.

 

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष अशोक लाडवंजारी व प्रमुख अतिथी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने  केली. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यची माहिती सांगितली. उत्कृष्ट माहिती खुशी राठोड इयत्ता ७ वी या विद्यार्थिनीने दिली. तिचे कौतुक अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी केले.

 

यावेळी  शिक्षिका संगीता कुलकर्णी मॅडम यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य, त्यांचे शैक्षणिक धोरण ,रयतेचा राजा शाहू महाराज यांच्या कोल्हापूर संस्थानातील सुधारणा विषयी माहिती दिली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी. छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ का साजरा केला जात आहे याविषयी माहिती दिलीत्यांचे आरक्षण विषयक धोरण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे याविषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सांस्कृतिक प्रमुख सौ प्रतिभा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.

Exit mobile version