Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द ; ठाकरे सरकारचा दणका

 

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. . नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला.

 

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. त्यानंतर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला होता.

Exit mobile version