Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पहूर पेठ अंतर्गत पहूर गावातील महादेव मंदिर पेव्हर ब्लॉक कामाचे उद्घाटन पहूर पेठच्या लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील, माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, उत्तर महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष रामेश्वर पाटील , पहूर पेठ विकासाचे व्हा.चेअरमन रवींद्र बारी, ईका पैलवान, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, ईश्वर बारी, भारत पाटील, संदीप बेढे, गोकुळ कुमावत, पत्रकार विनोद देशमुख मुंबई, मधुकर देशमुख, अर्जुन देशमुख, सुरेश बारी, विठ्ठल पाटील, बाबुराव बारी,अमोल दवंगे तसेच महादेव मंदिर संस्थांन ट्रस्ट चे सर्व सदस्य व पहूर पेठ चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version