Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे आजपासून पार्थिव शिवलिंग पूजन सप्ताहाचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथील त्रिवेणी संगमावर श्रावण मास निमित्ताने दि. ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान पार्थिव शिवलिंग पूजन व अखंड रामधून सप्ताहाचे आयोजन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

दिनांक १६ ऑगस्ट रोजी महासत्यनारायण पूजन व महाप्रसाद वाटपाणे कार्यक्रमाची सांगता होईल तर श्रावण मास निमित्ताने भाविकांची गर्दीचे बस सेवा थेट कपिलेश्वर येथे सुरू नसल्याने होणारी गैरसोय बाबत वृत्त प्रकाशित केले होते त्याची दखल घेऊन दिनांक ८ पासून श्रावण मास संपेपर्यंत आगार प्रमुखांनी निम जाणाऱ्या सर्व बसेस थेट कपिलेश्वर मंदिरापर्यत नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.

महामंडलेश्वर मठाधिपती हंसानंद तीर्थ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ७ ते १० पार्थिव शिवलिंग निर्माण कार्य होईल व ११ ते २ यावेळेस षोडशोपचारे पूजन करीत अभिषेक करून दुपारी २ ते ३ पर्यंत तापी पांझरा नदीच्या तीरावर पार्थिव शिवलिंग विसर्जित करून अखंड रामधूनचा कार्यक्रम आठवडाभर चालणार असून भाविकांनी सकाळी ६:३० पर्यंत मंदिर परिसरात हजर रहावे लागेल, यासाठी लागणारे पूजन साहित्य भाविकांनी स्वतः आणावे लागेल.

Exit mobile version