श्रमिक कामगारांच्या नोंदणीसाठी गरीबांची आर्थीक लुट; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील श्रमिक कार्ड नोंदणीसाठी काही व्यक्ती पैसे घेवून काम करत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र असंघटीत कामगार काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भैय्याजी बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांची भेट घेवून कारवाई करण्यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करणार गोरगरीब नागरीकांकडुन शासनाच्या वतीने कष्टकरी समाजाला कुठतरी मदत मिळावी यादृष्टीकोणातुन घेण्यात येत असलेल्या श्रमिक नोंदणी कार्यक्रम राबविले जात आहे.  परंतू जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी नोंदणीचे कार्यक्रम सुरू आहे. या नोंदणी करण्यासाठी जाणाऱ्या गरीबांकडून आर्थीक लूट केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे.

याबाबत कामगार उपायुक्त यांची भेट घेवून याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या लेबर कमिशन म्हैसकर यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क करून माहिती देण्यात आली. त्यानी याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रसन्न देशमुख, विभागीय उपाध्यक्ष अजय बढे, फय्याज हुसैन, प्रेरणा भंगाळे,  योगिता शुक्ला, मदिनाताई तडवी, अमिना तडवी, प्रशांत किरंगे, अमन रिल, ॲड. नितीन  चौधरी, ॲड. देवेंद्र बाविस्कर, ॲड. लोंढे, ॲड. आर. टी. पटेल, उल्हास मुरलीधर नेमाडे, जुगल घारू, हाजी नईम, प्रदीप आदिवल, हाफिज खान, छायाताई कोरडे आदी उपस्थित होते.

 

Protected Content