Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘श्रमिक एक्सप्रेस’मधून प्रवास करणाऱ्या परप्रांतिय मजूराचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंबई येथे अडकलेले परप्रांतिय सध्या आपापल्या विविध राज्याकडे निघाले आहे. रेल्वे प्रशासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू केले असून या एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मध्यप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राहणारा मजूराची प्रकृती खालावल्याने मृत्यू ओढावल्याचे दुदैवी घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहू प्रवास करणारा तरूण रामकुमार प्यारेलाल निर्मल (वय-२६) रा. पुरे टिकाराम, जि.प्रतापगड, मध्यप्रदेश याची प्रकृती अचानक खालावली होती. त्याला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरविण्यात येवून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असतांना २२ रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यास कुठलातरी दीर्घ आजार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिंद्र नगराळे, पोलीस कॉन्स्टेबल महाले करीत आहेत.

Exit mobile version