Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रद्धाच्या मारेकारला तत्काळ फासावर लटकवा

यावल  प्रतिनिधी |  श्रद्धा वालकर हिचा मारेकरी आफताबला तत्काळ फासावर लटकवावे या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने  आंदोलन  करण्यात आले.

 

लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात शासनाने कठोर आणि स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत असे हिंदू जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ सायली पाटील यांनी म्हटले आहे.  श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी  हिंदु जनजागृती समिती आणि समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने यावल येथील भुसावळ टि पॉईंट येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात सायली पाटील हिने  भावना व्यक्त केल्यात. यानंतर यावल तहसीलदार महेश पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. अभय रावते, पत्रकार सुधाकर धनगर, पत्रकार प्राची पाठक, भाजपचे भूषण फेगडे, हिंदुराष्ट्र सेना अध्यक्ष पियूष भोईटे, सांगवी येथील अधिवक्ता शरद कोळी, न्हावी येथील मयूर चौधरी आणि अनेक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version