Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शौर्य बॅलेस्टीक मिसाईलची यशस्वी चाचणी

 

बालासोर वृत्तसंस्था । अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या शौर्य या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

भारताने शनिवारी शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी प्रक्षेपण केलं. ओडिशाच्या बालासोर येथे याची चाचणी घेण्यात आली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भारताकडून विविध लढऊ शस्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे. या अनुषंगाने आज शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे प्रक्षेपण यशस्वी ठरले. त्यामुळे सध्याच्या क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट आली आहे. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलकं आणि सोपं आहे. शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून ८०० किमी दूरवर निशाणा लावला जाऊ शकतो. यामुळे अर्थातच भारताची सामरीक शक्ती वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यापूर्वी बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. या क्षेपणास्त्राला स्वदेशी बूस्टरसोबत लॉन्च करण्यात आले होते. यानंता शौर्य मिसाईलची घेतलेली चाचणी ही लक्षणीय मानली जात आहे.

Exit mobile version