शौचालय घोटाळा प्रकरण : तत्कालीन बीडीओंसह १५ जणांना मिळाला अटकपूर्व जामीन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर पंचायत समितीच्या वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारप्रकरणात अटकेत असलेले तत्कालीन बीडीओ हबीब तडवी यांच्यासह १५ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तर आतापर्यंत १ कोटी १ लाख रुपये संशयितांकडून वसुल करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राभर गाजलेला रावेर पंचायत समितीच्या वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गट विकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह १५ जणांचे नाव समोर आले होते. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने तात्कालीन बिडीओंसह १५ जणांचा अटकपुर्व जामीनाला मंजूरी दिली आहे. संशयित आरोपींकडून आतापर्यंत १ कोटी १ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तसेच वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेत असलेले ३३ पैकी ३२ जणांचे देखिल जामीन झाले असुन एक जण अजुन कारागृहात असल्याची माहीती तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी दिली आहे.

Protected Content