Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करा : पालकांची मागणी

 पारोळा, प्रतिनिधी  ।   श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.  या सभेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता शाळा उघडण्यासाठीची विनंती पालकांनी केली असता यास संस्थाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

सहविचार सभेचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यु. एच. करोडपती सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर , पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी पत्रकार संजय पाटील, पत्रकार विकास चौधरी, वैशाली अमृते, सचिन पाटील, जितेंद्र चौधरी, नीलिमा शिंपी, नगरसेवक धिरज महाजन, संतोष महाजन, अतुल वैष्णव,  राहुल नांदेडकर, देविदास वाणी, दिपाली विसपुते, अनिल देवरे, विजय सराफ,  नरेंद्र बधान व सौ हजारे मॅडम आदी उपस्थित होते.   पालक मनोगतात जितेंद्र चौधरी यांनी कोविड-१९ चे नियमांचे पालन करुन मास्क व सॅनिटायजरचा योग्य उपयोग करून शाळा सुरू करावी असे सांगितले. तर पालकांच्या मनोगतात राहुल नांदेडकर मुलांची काळजी पालकांपेक्षा शाळेला जास्त आहे असे मत व्यक्त केले.  धिरज महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास हा शाळेतूनच घडत असतो असे मत व्यक्त केले. भारती बडगुजर यांनी ऑनलाइन बंद करून प्रत्यक्ष पद्धतीने शाळा सुरू कराव्यात यासाठी आमच्या सर्व पालकांची आपणास कळकळीची विनंती आहे असे सांगीतले. ‌यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर यांनी संस्थेचा संपूर्ण स्टाफचे लसीकरण झालेलं असुन पालकांनी देखील लस घेण्याचे आवाहन करुन आपण शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना १९चे नियम पाळून लवकरच शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे न भरून निघणारे आहे, त्याकडे आपण गांभीर्याने बघून आपल्या सर्वांच्या संमतीने आपल्या निवेदनासह आम्ही शासनाकडे वरिष्ठांकडे अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर शाळा सुरु करणे संदर्भात पुरवठा करून. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय कोरोनाचे सर्व नियम पाळून लवकरच घेऊ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे गांभीर्याने योग्य तो निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याबाबत आपणास कळविण्यात येईल असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक विद्यालयाचे हेमंतकुमार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन धनेश पाठक व सुजीत कुमार कंसारा सर तसेच आभार विद्यालयाचे शिक्षक सुर्यकांत चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सभेस बाराशे विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

 

Exit mobile version