Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेरी शिवारातील खळ्यातून शेती साहित्यांची चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेरी शिवारातील खळ्यातून शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेरी येथे शेतकरी पोपट भिका पाटील (वय-६५) हे वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ९ एप्रिल रात्री ११ ते १० एप्रिल सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, त्यांच्या मालकीच्या खळ्यातून शेतीसाठी लागणारे साहित्य व अवजारे असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.

Exit mobile version