शेदुर्णी येथे गुणवंत विद्यार्थ्यांची शोभायात्रा

शेंदुर्णी- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयामध्ये शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांवरील इयत्ता दहावीच्या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांची शोभायात्रा शेंदुर्णी शहरातून काढण्यात आली.

 

शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या शेंदुर्णी, पाळधी, वाकोद, विटनेर, पळसखेडा ,बेटावद, वाकडी, लोहारा, तोंडापूर, वरखेडी ,नांद्रा ,तारखेडा, वडगाव ,गणपुर, मंगरूळ या शाखामधील विद्यार्थी हे शेंदुर्णी नगरपंचायतीच्या प्रांगणात एकत्र आले होते. या ठिकाणाहून गरुड विद्यालयातून तालुक्यातून प्रथम आलेली पूर्वा श्रीकांत काबरा व तालुक्यातून द्वितीय आलेली ऐश्वर्या हितेंद्र गरुड या विद्यार्थिनींची घोड्यावर बसून व शेंदुर्णी संस्थेच्या सर्व शाखावरील गुणवंत विद्यार्थिनी विद्यार्थी यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी या शोभायात्रेची सुरुवात संस्थेचे सचिव सतीश काशीद, संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद संस्थेचे वस्तीग्रह सचिव कैलास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार, उपमुख्याध्यापक ए. बी. ठोके तसेच सर्व शाखांवरील विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेला हिरवी झेंडी संस्थेचे सचिव सतिश काशीद यांनी दाखवली. शोभायात्रा ही ढोल-ताशांच्या गजरात सुरु करण्यात आली. शोभायात्रेच्या प्रारंभी एनसीसीचे विद्यार्थी होते, त्यानंतर गुणवंत विद्यार्थी होते. शोभायात्रे दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला व त्यांचे औक्षण करण्यात आले. या शोभायात्रेचा समारोप हा विद्यालयामध्ये करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. पी. उदार यांनी केले. यानंतर विद्यालयाच्या व संस्थेच्या सर्व शाखां वरील गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक यु. यु. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर संस्थेचे सचिव सतीश काशीद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर पालक मनोगतामध्ये श्रीकांत काबरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये उपमुख्याध्यापक ए. बी. ठोके, संस्थेच्या तसेच सर्व शाखांवरील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पी. जी. पाटील यांनी केले तर आभार डी. बी. पाटील यांनी मानले.

Protected Content