Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे देवा…इस्टेटीसाठी आईला जाळण्याचा प्रयत्न

रावेर, शालीक महाजन । एकीकडे कोरोनामुळे नातेसंबंधांवर प्रश्‍नचिन्ह लावणार्‍या घटना दिसत असतांना दुसरीकडे कौटुंबिक पातळीवरील हिंसक प्रकार देखील वाढीस लागले आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील मोरगाव येथे घडली असून शेती नावावर करून देत नाही म्हणून एका कुपुत्राने आपल्या आईला जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील मोरगांव खुर्द येथून शेत जमीन विकुन मुलाच्या नावावर करावी तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्याला द्यावे म्हणून स्वता:च्या मुलाने आपल्या ७० वर्षीय आई जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला व स्वत:चे घरदेखील पेटवुन दिले आहे. सुगंधा पाटील ( वय ७० ) असे या गंभीर भाजलेल्या महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात अतिशय खळबळ उडाली आहे. समाजमन सुन्न करणार्‍या या घटनेमुळे आई व पुत्राच्या नात्याला काळीमा फासल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Exit mobile version