Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतात मानवी कवटी व हाडे आढळल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज । जळगाव तालुक्यातील नशिराबाद शेत शिवारातील शेतात मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शुक्रवार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद शिवारातील शेतात नारायण पाथरवट हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताजवळ मानवी कवटी व हाडे आढळून आले. या संदर्भात त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांना माहिती देऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. यावेळी मानवी कवटीच्या बाजूला आधारकार्ड, सॅमसंग मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यानुसार मयत व्यक्ती हा रामा उराव (वय-५२, रा. मोकार्या जि. लोहरदगा राज्य झारखंड) असे असल्याचे दिसून आले. त्या संदर्भात पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version