Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतात अल्पवयीन मुलाने उचलले टोकाचे पाऊल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहित वर्णेश्वर साळुंखे कोळी (वय-१६, रा. अंजनविहिरे ता. धरणगाव जि. जळगाव) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, मोहित कोळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्यापूर्वी मोहित वर्णेश्वर साळुंखे याने अंजनविहिरे शिवारातील संदीप छगन पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला सुती दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार शेतातील शेतमजुरांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरून तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मोती पवार करीत आहे.

 

Exit mobile version