Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्याची ७० हजाराची बैलजोडीची चोरी; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील गावातलगत असलेल्या खळ्यातुन एका शेतकऱ्याच्या ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभूर्णी तनोज काशिनाथ पाटील (वय-४५) या शेतकऱ्याच्या गावालगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतातील खळ्याला कम्पाउंड असुन गेट लावला आहे.  या खळयात  बांधलेल्या सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस कुणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. तनोज पाटील यांनी ४ मार्च रोजी सायकाळी ७.३० वाजता चारापाणी टाकण्यास गेले होते. त्यांनंतर ५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाटील हे पुन्हा आपल्या खळयात गेलो असता त्यांना बैलजोडी दिसून आली नाही. फिर्यादीचे वडील व इतर सर्वांनी चोपडा व यावल परिसरात बैलजोडीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. अखेर तनोज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेरा मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविन्द्र पाटील हे तपास करीत आहे .

Exit mobile version