Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्याची सुमारे दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

रावेर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | थकीत वीज खंडीत करण्याच्या बहाणान्याने  येथील एका व्यक्तीकडून ओटीपी मिळवून ऑनलाईन पध्दतीने सुमारे एक लाख ९६ हजार ७५२ रुपये काढून फसवणूक केल्याची घटना ( ता .१) रोजी घडली . याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

या बाबतचे वृत्त असे की, विजय जीवराम महाजन हे शेतकरी रा. चोरवड (ता. रावेर ) येथील व ह.  मु. भगवती नगर जुना सावदा रोड रावेर येथे राहतात . दि . १ डिसेंबर रोजी ८९९९९६३९९२० या क्रमांकावरून विजय महाजन यांना अज्ञात व्यक्तीने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आहे . असे भासवून कंपनीचा लोगो असलेला मेसेज पाठवून तुमचा विज पुरवठा खंडीत केला जाईल . तुम्ही तातडीने वीज बीलाचे पैसे भरा या बाबत  डेबीट कार्ड द्वारे ऑन लाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगीतले . या नंतर अज्ञात इसमाने ओटीपी नंबर मिळवून विजय महाजन यांच्या आय सी आय सी आय या बँकेच्या खात्यातून एक लाख ९६ हजार ७५२ परस्पर काढुन फसवणूक केली. याबाबत विजय महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (डी) प्रमाणे अज्ञात व्यक्ति विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत.

 

Exit mobile version