शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या ; भाजपाची मागणी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यात रब्बी हंगामातील पिके कापणीला असताना अचानक दि.२० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार यांना भाजपाकडून करण्यात आली. 

तालुक्यात रब्बी हंगामातील पिके जसे ज्वारी, मक्का, भुईमूग, केळी व बाजरी आदी पिके हि कापणीला होती. परंतु दि.२० मार्च रोजी सायंकाळी अचानक अवकाळी वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला असून जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना भारतीय जनता पक्षातर्फे आज देण्यात आले. कोरोनाच्या काळात शेतकरीचे आर्थिक गणित हे बिघडलेले असतांना  अजून अवकाळीचे भर पडल्याने जगावे कसे हा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.   निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम, नितीन पाटील, विशाल सोनवणे, नितीन चौधरी, भावेश सोनवणे, चेतन चव्हाण, किरण पाटील, साळुंखे, अमोल चव्हाण, कैलास पाटील, उमेश आव्हाड, दिपक राजपूत, सुदाम चव्हाण व संजय भास्करराव पाटील आदींची सही आहे. 

 

Protected Content