Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांना त्वरित पिका विम्याची रक्कम अदा करा : मनसेची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | शेतकऱ्यांना त्वरित पिका विम्याची रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, २७ मे २०२१ रोजी झालेल्या चक्रीवादळात केळी बागायतदार शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. यात शेतातील केळी १०० टक्के उध्वस्त झालेली असतांना विमाधारक शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचा लाभ मिळालेला नाही, काही शेतकऱ्यांना दोन हजार, तीन हजार रुपये हेक्टरी रक्कम देवून विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदवून देखील विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना त्वरित विमा मंजूर करण्यात यावा. या शेतकऱ्यांना सरसकट ४० हजार ते ५० हजार रुपये विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना जनहित मनसे जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे, अतुल जावरे, मधुकर भोई, श्रीराम भोई, मंगेश कोळी, अतुल कोळी, दिनेश बविसकर, सुरेश बोदके, सुनील कोळी, निलेश सापधरे, दीपक दुत्ते, मुकेश झा, गोपाळ वाघ, हेमन गुल्गे आदी मनसे पदाधिकरि व मनसे सैनिक उपस्थित होते.

Exit mobile version