Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचे भुसावळात आंदोलन

 

भुसावळ : प्रतिनिधी ।   भुसावळ तालुका  वंचित बहूजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून  निवेदन आज  प्रांताधिकारी यांना देण्यात आले .

 

या निवेदनात म्हटले आहे की ,  दिल्ली येथे देशातील शेतकरी न भुतो न भविष्यती आंदोलन करीत आहे.केंद्र सरकारने लॉकडॉऊनच्या काळात शेती संबंधी तीन नविन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्याबळाच्या आधारावर मंजुर करून घेतले या नविन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरक्षा नागवला जाणार आहे.जागतिककीकरण आणि त्या मागुन अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्यांचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळगृत करण्याचा राजमार्ग या नविन विधेयकात आहे. दिल्लीत  शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला पाठींबा म्हणून आम्ही ५ मार्चरोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

 

महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिलेला आहे. महाआघाडीची ही भूमिका  प्रामाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व विधानसभेच्या  अधिवेशनात शेतकन्यांच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत (हमी भाव) मिळणे साठी कायद्यात स्पष्ट तरतुद करावी

 

शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मुख्यतः रेल्वेचा वापर होतो रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे.खाजगीकरणामुळे शेतमालाची वाहतुक प्रचंड खर्चीक होईल व सर्व सामान्य ग्राहकांवर वाढीव भावाचे ओझे लादले जाईल.रेल्वेचा खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा.

 

दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने रेल्वेच्या खाजगीकरणाला व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाला विरोध करण्याची भुमिका घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी करत आहे व शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठींबा देत आहे.

 

विनोद सोनवणे ( जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) , संतोष कोळी ( भुसावळ तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) , गणेश इंगळे ( भुसावळ तालुका सचिव ) , बंटि सोनवणे ( युवा आघाडी ) , देवदत्त मकासरे , बालाजी पठाडे ( वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन जिल्हा चिटणीस ) , रुपेश कुऱ्हाळे , कुणाल सुरडकर , सतिष बिऱ्हाडे ( तालुका उपाध्यक्ष ) , सचिन सोनवणे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले .

Exit mobile version