Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांची दुचाकी भामट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील नेरीनाका स्मशानभूमी जवळून एका शेतकऱ्याची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या संदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी २० मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनेश सुखदेव पाटील (वय-४५) रा. धानवड ता. जि. जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १५ मार्च रोजी दुपारी १ वाजता दिनेश पाटील हे आपली दुचाकी (एमएच १९ डीजी ३९६३) ने जळगाव शहरात खाजगी कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी नेरीनाका जवळील स्मशानभूमीच्या बाहेर रोडवर त्यांची दुचाकी लावून कामाच्या निमित्ताने निघून गेले. दरम्यान २ दोन वाजता दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला कुठेही मिळून आल्याने अखेर सोमवारी २० मार्च रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी २० मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रवींद्र बोदवडे करीत आहे.

Exit mobile version