शेतकऱ्यांचा सन्मान करून पोळा सण साजरा

चोपडा, प्रतिनिधी । श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने श्रीराम नगरातील  संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर  येथे ६  सप्टेंबर  रोजी पोळा सण  आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी सर यांनी शेतकऱ्यांचा उचित सन्मान केला.  शिवाजी नामदेव चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. वत्सलाबाई शिवाजी चौधरी त्याचप्रमाणे कैलास गंगाराम पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. कैलास पाटील तसेच  राजेंद्र विठ्ठल चौधरी या शेतकऱ्यांचा सत्कार केला. अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी घेऊन संताजी महाराजांचे दर्शन घेतले.  प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना के. डी. चौधरी यांनी शेतकरी शेतात राबराब राबत असल्याने  आपण त्यांनी पिकवलेल्या अन्नावर जीवन जगत असल्याचे नमूद केले. बैलाकडून सतत शेतीची काम केले जातात.  त्यामुळे बैलाचं संरक्षण करणे , संवर्धन करणे हे अत्यंत जरुरीचे असल्याचे नमूद केले. गोवंश पालन करून त्यांची देखभाल करणे गोवंशाची काळजी घेणे हे जरुरीचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महेंद्र द्वारकादास चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ भारतीबाई महेंद्र चौधरी, तुळसाबाई चौधरी, विठोबा महाराज महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी, ह.भ.प .गोपीचंद महाराज, ह.भ.प .तेजस महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर राजाराम चौधरी, ह.भ.प. प्रकाश श्रावण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिपाठ कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते , सपत्नीक आरती करण्यात आली. प्रकाश श्रावण चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी जय जवान जय किसान. भारत माता की जय  घोषणा देण्यात आल्या.

Protected Content