Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांना मदतीचा पहिला टप्पा जाहीर

मुंबई प्रतिनिधी । राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या १५१ तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मदतीचा पहिला टप्पा देण्याची घोषणा केली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना २ हजार ९०० कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शेतकर्‍यांना दोन टप्प्यात मिळणार असून हे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. हंगामी पीक उत्पादक शेतकर्‍यांना कमीत कमी १ हजार रुपये तर फळबाग शेतकर्‍यांना कमीत कमी दोन हजार रुपये मिळणार आहेत. हंगामी पीक घेणार्‍या आणि दोन हेक्टरपर्यंत पात्र असलेल्या शेतकर्‍यांची संख्या अंदाजे २१ लाख ३८ हजार ९७० इतकी आहे. तर फळबाग आणि दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या पात्र शेतकर्‍यांची संख्या अंदाजे ८ लाख ८ हजार ५५ इतकी असल्याची माहिती आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. परंतु, आचारसंहिता घोषित झालेल्या २६४ ग्रामपंचायतींना तूर्तास ही मदत मिळणार नाही. शेतकर्‍यांनी ज्या बँक खात्याचे आधार लिंक केले आहे, त्याच खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत.

Exit mobile version