शेतकर्‍यांना नुकसानीची अग्रीम रक्कम द्या : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी | आधी पावसाने मारलेली दडी आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कपाशी व बाजरी या पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना १० दिवसांच्या आत २५ टक्के अग्रिम देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भारती ऍक्सा विमा कंपनीला दिले आहे.

जिल्ह्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीबाबत शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठक घेतली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे तसेच भारती ऍक्सा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे अमळनेर, चोपडा व पारोळा या तालुक्यात मूग, उडीद, कपाशी व बाजरी या पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना १० दिवसांच्या आत २५ टक्के अग्रिम देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भारती ऍक्सा विमा कंपनीला दिले आहे.

तर, आगामी दिवसांमध्ये एकाचवेळी शेतकर्‍यांनी विमा काढल्यास सर्व्हर डाऊन व इतर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी तातडीने केळी पीक विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी केले आहे.

Protected Content