Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा; उद्या राजभरात आंदोलने

मुंबई प्रतिनिधी । दिल्लीत सुरू असणार्‍या शेतकरी आंदोलनास काँग्रेसने पाठींबा दिला असून उद्या याच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने काँग्रेस पक्ष दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यांत उद्या आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version