शेतकरी संघटनेतर्फे खासदार पाटील यांना निवेदन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे खासदार पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 

केंद्र शासनाच्या आदेशावरून सेबीने सात शेती मालाच्या गहू तांदूळ मुग चना सोयाबीन व मोहरी व पामतेल वायदे  व्यवहारावरि बंदीला एक वर्षाची 3 डिसेंबर 2023 मुदत वाढ दिली आहे या निर्बंधामुळे या सर्व शेतमालाच्या किमती खालच्या पातळीवर स्थिर राहिल्या आहेत ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड  आर्थिक नुकसान होत आहे.

 

अश्या प्रकारे शेतीमाल व्यापारात केंद सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पडत आहे परिणामी शेतकरी कर्जबाजारी होहून आत्महत्या करीत आहे ह्या करीता आपल्या जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांना लोकसभेत आवाज उठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच पीक विमा अटल भूजल योजना व अतिवृष्टी अनुदान 2022  मिळावे ह्यासाठी निवेदन देण्यात आले  खासदारांनी लोकसभेत आवाज उठवेन असे आश्वासन देवून आस्थेवाईकपणे चर्चा केली.

 

ह्या प्रसंगी स्व .शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका अध्यक्ष प्रा.भिकनराव पाटील, सचिव डॉ प्रवीण पाटील, प्रसिध्दी प्रमुख वाल्मिक कापडणे, सुनील साहेबराव पाटील, अनिल बोरसे आधिकर पाटील मार्गदर्शक अरविंद बोरसे सुयोग पाटील, गुलाब , कृष्णकांत  पाटील, योगेश पाटील, जगदीश  मनोरे, विजय लांडगे, नदकिशोर पाटील, भागवत महाजन, अविनाश पाटील, शशिकांत पाटील, गणेश पाटील, राकेश पाटील, काशिनाथ पवार, रवींद्र चंचोर, जितेंद्र लांडगे, राहुल पाटील उपस्थित होते.

Protected Content