Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी वहिवाटीचे अवैध खोदकाम; राष्ट्रवादीची कारवाई मागणी

यावल,   प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे गावाजवळील बऱ्हाणपुर ते अंकलेश्वर महामार्गावर एका पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी शेतकरी व मजुरांचा वहिवाटीचा रस्ता खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे भविष्यात मोठे संकट होवू शकत उद्भवू  शकत असल्याने या सर्व कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे शहर अध्यक्ष कामराज घारू यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

या संदर्भात कामराज घारू यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ बऱ्हाणपुर ते अंकलेश्वर महामार्गावर नदीपात्राच्या मध्यभागी शेतकरी व शेतमजुरांच्या येण्याजाण्यासाठी रस्ता होता. या ठीकाणी नविन पेट्रोल पंपाचे बांधकाम करण्यात येत आहे.  संबंधीत बांधकाम करणाऱ्यांनी शेतकरी वहीवाटीचा सुमारे १०० ते १५० फुट खोल रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी चारी पाडुन तेथील माती हे पेट्रोल पंपाच्या आवारात भरावासाठी टाकण्यात येत आहे.  हा प्रकार  पंप संचालकांच्या बांधकामाच्या गोंधळामुळे झाला असून, यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुर यांना खोदलेल्या चारीमुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे.  या मार्गावरून जातांना बैलगाडी व इतर वाहन या चारीच्या मार्गाने गेल्यास मोठे  अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चारीतील खोदलेल्या खड्डयामुळे अपघात होवुन मोठया प्रमाणावर शारीरिक इजा पोहचल्यास व त्यामुळे होणारे नुकसान व गंभीर दुखापतीमुळे शेतकऱ्यांचे वैद्यकीय खर्चाचा आर्थिक भुर्दंड सोसावे लागु शकतो. या अवैध खोदकामाविषयी हिंगोणा, हंबर्डी, सांगवी बु॥ आणि  भालोद परिसरातील शेकडो शेतकरी तसेच जागृत नागरीकांच्या अनेक तोंडी तक्रारी आहेत. महसुल प्रशासनाने संबंधीत पेट्रोल पंप चालक व मालक यांना स्वतः च्या  आर्थिक व्यवहारासाठी खोदलेल्या त्या नदीपात्रातील चारीस शेतकऱ्यांच्या वापरासाठी पूर्ववत  करून देण्यास आदेश द्यावेत  तसे न झाल्यास आपण पाच ते सहा दिवसांनंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासच्या माध्यमातुन आंदोलन करू असा इशारा नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांनी दिला आहे.याप्रसंगी तहसील कोषागार विभागाचे मुक्तार तडवी ही उस्थित होते .

 

Exit mobile version