Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी आणि सरकारमधील विषयात कोणी पडू नका – सनी देओल

sunny deol 1558254425

नवी दिल्ली । दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन चिघळले असतांना आता अभिनेता तथा भाजपचा खासदार सनी देओल याने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत शेतकरी आणि सरकारमधील विषयात कुणी पडू नये असा इशारा दिला आहे.

अभिनेता आणि भाजपचे गुरूदासपूरहून खासदार असलेले सनी देओल यांनी शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी भाजप आणि शेतकर्‍यांसोबत आहे. जगातील काही समुदायांकडून शेतकरी आंदोलनावर येत असलेल्या प्रतिक्रियांवर बोलताना देओल यांनी मी विनंती करतो की, हा विषय शेतकरी आणि सरकारमधील आहे. यांच्यामध्ये कोणी दुसर्‍यांनी येऊ नये. सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये चर्चा सुरू आहे. यांच्यामध्ये कोणतातरी मार्ग नक्कच निघेल.

मला माहित आहे. काही लोक या आंदोलनाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांना यातून फायदा उठवायचा आहे. आणि संकटात भर टाकायची आहे. असे लोक शेतकर्‍यांच्या हितासाठी नाही तर, स्वत: च्या अजेंड्यासाठी पुढे आल्याचा आरोप सनी देओल यांनी केला आहे.

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

 

Exit mobile version