Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेअर बाजार कोसळला

market

 

मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८ अंकांनी कोसळला आहे.

यंदाचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि निराशाजनक असल्याची टीका पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या अशिमा गोयल यांनी केली आहे. ‘बजेट’मध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचे सांगत गोयल यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे मूडीजने चालू वर्षासाठी जीडीपीचा वृद्धीदर ६.६ टक्क्यांवरून घटवून ५.४ टक्के केल्याचे पडसाद आज सकाळी शेअर बाजारात उमटले. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४ अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स ४० हजार ८०० अंकांवर तर निफ्टी ११ हजार ९७० अंकांवर होता. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यास भारताला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे कारण देत मूडीजने सोमवारी चालू वर्षासाठी जीडीपीचा वृद्धीदर ६.६ टक्क्यांवरून घटवून ५.४ टक्के केला. गेल्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था कमालीच्या मंदगतीने वाटचाल करत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. २०१९ या वर्षासाठी मूडीजने जीडीपी वृद्धीदराचा अंदाज ५ टक्के घोषित केला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Exit mobile version